आषाणे-कोषाणे नाही की सोलनपाडा, भिलवली नको, नको झेनिथ धबधबा…पोलीस कस्टडीत बसण्याऐवजी गप्प घरी बसा!

0
727

कर्जत, खालापूरातील पर्यटन स्थळे व धबधबे परिसरात जमावबंदी

अलिबाग । पावसाळ्यात कर्जत खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात. मात्र अनेकजण मद्य पिऊन पाण्यात उतरतात. काहींना पोहता येत नाही, त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थादेखील धोक्यात येते. त्यामुळे धबधबा, धरण क्षेत्रात 1 कि.मी. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून या ठिकाणी पोहायला, फिरायला गेलात तर पोलीस कस्टडीत बसायची वेळ तुमच्यावर येऊ शकते.


कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण-पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणालाही पर्यटनासाठी जाता येणार नाही.
खालापूर तालुक्यातील धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, वावर्ले धरण, झेनिथ धबधबा परिसर, नढाळ धरण, आडोशी धबधबा, मोरबे धरण, आडोशी पाझर तलाव, झेनिथ धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक वळणांवर सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे बंदी राहणार आहे.

वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम, अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन चालविणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॉस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॉस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, ध्वनी प्रदूषण होईल अशा आवाजात सार्वजनिक ठिकाणी संगीत यंत्रणा वाजविणे, ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण तसेच धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना 22 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here