महाड तालुक्यामध्ये आज 13 नवे कोरोना रुग्ण

0
711
चाळीस रुग्ण झाले कोरोना मुक्त

महाड : महाड तालुक्यामध्ये आज (३१ जुलै) १३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यामध्ये शहरातील पाच आणि तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे. तर उपचार सुरू असलेले ४० रुग्ण कोरोनावर मात करुन आपल्या घरी परतले आहेत.

आज नव्याने नोंद झालेल्या १३ रुग्णांमध्ये महाड तालुक्यातील शिरगांव येथील ४२ वर्षांचा पुरूष, ओमसाईनगर बिरवाडी येथील ५६ वर्षांचा पुरूष, कुंभारकोंड नाते येथील २७ वर्षांचा तरुण, मधले आवाड बिरवाडीमधील ५६ वर्षांचा पुरूष, नवी वसाहत करंजखोलमधील ३६ वर्षांचा तरुण, वरंध येथील २४ वर्षांचा तरुण आणि किंजळघर येथील ५० वर्षांची महिला, शिरगांव येथील ४२ वर्षांचा पुरूष तर महाड शहरातील नवेनगर येथील ५४ वर्षांची महिला, कुलदीप अपार्टमेंट मुंबई-गोवा महामार्ग येथील ५८ वर्षांचा पुरूष, चवदारतळे येथील ५८ वर्षांचा पुरूष, सरेकर आळी येथील ४७ वर्षांचा पुरूष आणि तांबड भुवन येथील ४६ वर्षांची महिला या रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here