कर्जत तालुक्यात 18 कोरोना पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू

0
411

कर्जत: कर्जत तालुक्यात कोरोना वाढतच चालला असून आता त्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागही ‘लक्ष’ केले आहे. आज कोरोनाचे 18 रुग्ण आढळले असून एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 472 कोरोना रुग्ण सापडले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 354 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज तालुक्यात 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण कर्जत नगरपरिषद हद्दीतील असून 6 रुग्ण तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यात भयभीत वातावरण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here