दहावीत पोलादपूर विद्यामंदिर प्रशालेचे विद्यार्थी अव्वल

0
95

शैलेश पालकर/पोलादपूर : तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांच्या एसएससी परिक्षेच्या निकालांमध्ये विद्यामंदिर पोलादपूरचे पहिले पाच विद्यार्थी संपूर्ण तालुक्यात अव्वल आले असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे स्थानिक सभापती निवास शेठ यांनी दिली.

रयतच्या पोलादपूर विद्यामंदिरमध्ये यंदा 161 विद्यार्थ्यांपैकी 143 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 88.81 टक्के निकाल लागला आहे. प्रशालेतून आदित्य तात्यासाहेब जाधव 95 टक्के गुणांसह प्रथम, आदित्य अण्णासाहेब गोरे 94.89 टक्के गुणांसह द्वितीय तर अपेक्षा प्रमोद गायकवाड तृतीय क्रमांकांची मानकरी ठरली आहे. रयतच्या तुर्भे न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल 92.85 टक्के लागला असून सायली चंद्रकांत उतेकर 88.60 टक्के गुणांसह प्रथम, अश्विनी भिवा उतेकर 86.40 टक्के द्वितीय, दिक्षा गणेश देवे 85.40 आणि पल्लवी काशीनाथ जाधव 85.40 टक्के गुणांनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.

माध्यमिक विद्यालय सवादची जिया रोशन तांबे हिने 92.20टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रगती आत्माराम पार्टे 88.40 टक्के द्वितीय तर वैष्णवी कैलास नवगणे 84.40 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. पळचिलच्या शां.स.जाधव न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची संजिवनी मदन सकपाळ 70.60 टक्के प्रथम, कशिश अमोल फुलारे 68.40 टक्के दुसरा तर सोनाली संतोष बर्गे 66.60 टक्के गुणांसह तिसरी आली आहे. लोहारे येथील साने गुरूजी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाची सांची विलास निकम 91.80 टक्के प्रथम, लावण्या श्रीकांत निकम 89.80 टक्के द्वितीय आणि प्रज्ञा प्रशांत डिगे 89.60 टक्के गुणांनी तिसर्‍या क्रमांकावर राहिली.

पोलादपूरच्या शंकरराव गोपाळराव महाडीक न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून बासिद बशीर धामणकर 86.60 टक्के गुण मिळवून प्रथम तर सुयश सचिन साळवी 73.88 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पोलादपूर तालुक्यातील ओंबळी येथील पोपटमहाराज ताजणे हायस्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून पैठण रयत विद्यालयाचा निकाल 86 टक्के लागला आहे. अनेक माध्यमिक विद्यालयांच्या अधिकृत निकालांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here