Thursday, 3 April, 2025

पनवेल येथे सिडको वसाहतीत तीव्र पाणीटंचाइ , कमी दाबाने येणार्‍या पाण्यामुळे नागरिकांचा घसा कोरडा

By Raigad Times    31-Mar-2025
Total Views | 27
 panvel
 
पनवेल | पनवेल परिसरात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सिडको प्रशासनाच्या नावाने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली शहरात असुरळीत पाणी पुरवठा सुरु असला तरी नळाला मात्र कमी दाबाने येणार्‍या पाण्यामुळे पनवेलकरांचा घसा कोरडा पडत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून मार्केटमध्ये यावर्षी पाणी साठवून ठेवण्याच्या इमच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे इम विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 
शहरातील गेल्या कित्सक व्यापार्‍यांकडे विक्रीस ठेवले जात आहेत. या आधी इमला ग्राहक पसंती देत असले तरी त्याची कारणे वेगळी होती. या इमचा वापर पाणी साठवण्याबरोबरच तांदूळ आणि गहू साठवून ठेवण्याकरता सुद्धा केला जात असे. परंतु शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केल्याने या वर्षों पाणी साठवण्याकरता डुमना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.
 
बाजारात वीस लिटर पासून दीडशे लिटर पर्यंत इम बाजारात उपलब्ध असून त्यांची किंमत २५० पासून १ हजार २०० रुपया पर्यंत आहे. ग्राहक ड्रम खरेदी करताना गरजेला महत्व देत असून किमतीकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहारा बरोबरीच ग्रामीण भागात विहिरी, तळी आणि बोरिंगने सुद्धा तळ गाठल्याने ग्रामीण भागातून सुद्धा ड्रमला मोठी मागणी आहे. अजून पावसाळा सुरू होण्याकरता दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पनवेल शहराला पाणी पुरवठा करणार्‍या आप्पा साहेब वेदक जलाशयाने आत्ताच तळ गाठला आहे.
 
वर्षाच्या सुरवाती पासून एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून वारंवार शटडाऊन घेतला जात आहे. त्याचबरोबर आणीबाणी तर उन्हाळयात टंचाई भासू नये यासाठी देहरंग धरणात पाणी साठवून ठेवण्यात येणार होते. पनवेल शहरासाठी दररोज २७ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. एमआयडीसी आणि एमजेपीकडून देहरंग घरणातील पाणी शहराला दिले जाते.
 
एमआयडीसी व एमजेपी पातळगंगा नदीतून पाणी उचलतात. परंतु या ठिकाणी वारंवार सटडाऊन घेतला जातो. त्यामुळे सच्या देहरंग धरणातून जास्त उपासा करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या कडून पनवेल शहराला कमी पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्याकडून सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने पनवेलकरांची सध्या तहान ही गाडेेशर धरणातून मोठ्या प्रमाणात भागवली जात आहे.
 
गाडेेशर धरणातील पाणी जर या पद्धतीने घेतले गेले तर पुढील काळात पाणीबाणी निर्माण होऊ शकत असल्याचे महापौर यांच्या निर्देशनात आल्यावर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्या सोबत प्रदीर्घ चर्चा केली. बैठकीत पाण्याची तूट भरून काढण्यावर भर देण्यात आला. गाडेेशर धरणात अंदाजे १५० एमएलडी पाणीसाठा शिल्लक असून साधारण १० ते १५ टक्के पाणी धरणात उपलब्ध आहे.
 
युद्धपातळीवर उपाय योजना म्हणून मागील वर्षी सर्व राजकीय पक्षांनी शेजारी असलेल्या नवी मुंबईकडे पाण्याची मागणी केली होती. सध्या पनवेलकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांची पाण्याचे स्वतःव नियोजन करण्यास सुरवात केली असून उपाय योजना म्हणून बाजारातून नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्या करता इम खरेदी करत असून थोड्या प्रमाणात का होईना पण पाण्याचे नियोजन होत असल्याचे गृहिणी श्रद्धा घरत यांनी सांगितले.
 
पनवेल शहरला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ६ एमएलडी. एमआयडीसीकडून ५.५० एमएलडी आणि पालिकेच्या मालकीच्या गाईेशर धरणातून १६ एमएलडी पाणी घेऊन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या कडून अतिरिक्त १० एमएलडी पाणी मिळाल्यास भविष्यात शहरवासीयांना पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही.